…तर हाहाकार उडाला असता, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कोरोना नियंत्रणात असल्याचे कारण

5713
फोटो- प्रातिनिधीक

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोरोनाने वेग पकडला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 18 हजार पार गेला आहे. याबाबत शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. वेळीच लॉकडाऊन लागू केला नसता तर देशात 78 हजार मृत्यू झाले असते. तसेच रूग्णांची संख्या 12 ते 29 लाख असती, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान, देशात गेल्या 4 दिवसापासून दिवसाला 1 लाख चाचण्या घेतल्या जात आहेत. शुक्रवार दुपार पर्यंत 27 लाख 55 हजार 714 चाचण्या झाल्या आहेत. सध्या दिवसाला 1 लाख 3 हजार 829 चाचण्या होत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गेल्या 234 तासात 6,088 रुग्ण आढळले असले तरी 3 हजार 234 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 48 हजार 534 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 40 पेक्षा जास्त असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

पाच राज्यात 80 टक्के रुग्ण
21 मे पर्यंत देशातील काही भागात कोरोनाचे रुग्ण जास्त दिसत आहेत. काही राज्य आणि जिल्हे व शहरात विषाणूचे संक्रमण केंद्रित झाले आहे. या बाबत माहिती देताना डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, पाच राज्यात 80 टक्के आणि पाच शहरात 60 टक्के पेक्षा जास्त केसेस आहेत. तर रुग्ण संख्या आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी असल्याचे ते म्हणाले.

… तर मृतांचा आकडा 78 हजार असता
डॉ. व्ही के पॉल पुढे म्हणाले की, अनेक अहवालातून असे समोर आले आहे की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वेळीच लागू केला नसता तर मृतांचा एकदा 37 ते 78 हजार असता. तसेच रुग्ण संख्या 14 ते 39 लाख असली असती. लोकांनी घराबाहेरील लक्ष्मण रेषा न ओलांडल्याने आपण कोरोनाचा नियंत्रणात ठेऊ शकलो, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या