राज्यात 24 तासांत 7,429 कोरोनामुक्त, नव्या 8 हजार 151 रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी राज्यात दिवभरात एकूण 7 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. तर एकूण 8 हजार 151 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आज एकूण 213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 82 लाख 51 हजार 234 कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 16 लाख 9 हजार 516 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात एकूण 1लाख 74 हजार 265 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात 1,090 कोरोना रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात 1,090 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एपूण 1,470 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 2 लाख 14 हजार 375 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 45 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 45 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 9 हजार 821 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 99 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 444 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 13 लाख 74 हजार 754 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 262 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या