#corona आदेशाचे उल्लंघन करून लग्न समारंभ साजरा, उरण येथे उद्योजकावर गुन्हा दाखल

641

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. उरण तालुक्यात देखील या विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून कठोर उपाय योजना आखल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश असतानाही लग्न समारंभात मोठा जमाव जमविल्यामुळे उरण पोलिसांनी तहसिलदारांच्या आदेशानुसार लग्न समारंभ साजरा करणाऱ्या उद्योजकावर गुन्हा दाखल केला आहे. उरण तहसिलदार, मुख्याधिकारी आणि पोलिस यांनी आवाहन केल्यानंतर शुक्रवारपासून उरण शहरातील बाजारपेठेतील अनेक
दुकाने बंद करण्यात आली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक फिरणे, जमाव करणे टाळावे, तसेच धार्मिक विधी किंवा लग्न समारंभ कमीत कमी लोकांमध्ये साजरा करावा, एखाद्या व्यक्तीशी बोलताना किमान तीन मीटरचे अंतर राखावे असे आवाहन केले आहे. दरम्यान शासनाचे जमावबंदीचे आदेश असतानाही लग्न समारंभात मोठा लोकांचा जमाव जमविल्यामुळे प्रसिद्ध उद्योजक एन.जी ठाकूर आणि आयोजकांवर उरण पोलिस ठाण्यात भादवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे लग्न समारंभ साजरे करताना मोजक्याच लोकांमध्ये साजरे करा असे अवाहन तहसिलदार आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील 22 संशयितांना कॉरोटांईन करण्यात आले आहे. यामध्ये बोकडविरा येथिल केअर पॉईंट या हॉस्पिटलमध्ये 6, जेएनपीटी रुग्णालयात 6, खारघर येथे 4 तर सहा लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. उरण तालुक्यात आत्तापर्यंत एकसूद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या