को-विन हळूहळू पूर्वपदावर, दिवसभरात सोळाशे जणांना लस!

केंद्र सरकारच्या को-विन अॅपमधील तांत्रिक बिघाड दूर केल्यामुळे दोन दिवस स्थगित करण्यात आलेली लसीकरण प्रक्रिया आज पुन्हा सुरू झाली. को-विन अॅप पूर्वपदावर आल्यामुळे संपर्क करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी दिवसभरात 1 हजार 593 जणांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणाची कमी करण्यात आलेली वेळ आणि बुथची संख्या यामुळे मुंबईत लसीकरणाला 50 टक्के प्रतिसाद मिळाला. लसीकरणानंतर तिघा जणांमध्ये लसीचे किरकोळ साईड इफेक्ट दिसले, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत 3 हजार 523 जणांना लस देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने एपूण 9 लसीकरण केंद्रांवर मिळून 32 लसीकरण बूथ तर राज्य सरकारच्यावतीने जे. जे. रुग्णालयात एक केंद्र सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटकडून कोरोनावरील ‘कोव्हिशील्ड’ लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस महापालिकेला उपलब्ध झाले असून लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पालिका, सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

असे झाले लसीकरण

केईएम रुग्णालय      – 307

सायन रुग्णालय       – 110

पूपर रुग्णालय         – 229

नायर रुग्णालय        – 165

भाभा रुग्णालय        – 90

व्ही. एन. देसाई रुग्णालय – 59

राजावाडी रुग्णालय – 285

डॉ. आंबेडकर रुग्णालय      – 236

बीकेसी कोविड केंद्र   – 103

जे. जे. रुग्णालयात    – 13

एपूण                – 1,597

राज्यात 14 हजार कर्मचाऱ्यांना लस

राज्यात आज 274 केंद्रांवर 14 हजार 883 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कोणावरही गंभीर प्रतिपुल परिणाम झाला नाही. उद्या बुधवारीही लस दिली जाईल. अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. शनिवारी राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन पोर्टलवर 17 हजार 762 व्हॅक्सीनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या