रशियाने कोरोनाची लस बनवल्याची घोषणा, राष्ट्राध्यक्षांच्या मुलीलाही लस दिल्याचा दावा

1442

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसवरील लस बनवल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मुलीला देखील ती लस दिल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या लसीला मंजुरी दिली आहे. तसंच या लसीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर लवकरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली आहे. या लसीला मॉस्को येथील गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केलं आहे. मंगळवारी ही लस यशस्वी झाल्याची घोषणा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आली. आता लवकरच या लसीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात येईल.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या मुलीलाही कोरोना झाला होता. त्यानंतर तिला ही लस देण्यात आली. काही वेळ तिच्या शरीराचं तापमान वाढलं होतं. मात्र, तिची तब्येत आता एकदम पूर्ववत झाली आहे.

मास्कोतील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस एडोनोव्हायरसच्या आधारे बनवली आहे. त्याचे पार्टिकल या लसीत वापरण्यात आले आहे. या लसीतील पार्टिकल स्वतःची कॉपी बनवू शकत नाही, असे या लसीच्या संशोधनात असलेल्या डॉ. अलेक्झांडर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ही लस संशोधनात असलेल्या सर्व संशोधकांनाही देण्यात आली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे अलेक्झांडर यांनी सांगितले होते. ही लस दिल्यानंतर काही जणांना ताप येऊ शकतो, असेही ते म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या