ससूनमध्ये कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्य़ा मानवी चाचणीस आजपासून प्रारंभ

‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्य़ा टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ससूनने केलेल्या आवाहनाला स्वयंसेवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी सात जणांचे स्वॅब व अँटीबॉडी चाचणी केली असून, त्यांचा अहवाल उद्या येणार आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या स्वयंसेवकांना उद्यापासून लस देण्यात येणार आहे.

ससूनमध्ये एका दिवसात तेथे लसीकरणासाठी 49 जणांनी नोंद केली होती. आता, दोनच दिवसांत 600 पेक्षा अधिक स्वयंसेवकांची नोंदणी केली आहे. त्यापैकी रुग्णालयाने सोमवारी सात जणांना बोलावले होते. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना कोरोनाची लागण झाली नाही ना हे पाहण्यासाठी त्यांचे स्वॅबचे आणि अँटीबॉडी चाचणीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पात्र ठरलेल्यांना उद्यापासून लसीचा डोस दिला जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या