केईएममध्ये 19, नायरमध्ये 18 जणांना कोव्हिशिल्ड; डॉक्टरांच्या देखरेखीखाली चाचणी सुरू

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू असलेली कोव्हिशिल्ड लस देण्याची प्रक्रिया डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरू असून आतापर्यंत केईएममध्ये 19 स्वयंसेवकांना तर नायरमध्ये 18 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटच्या वतीने देशभरात 17 पेक्षा जास्त पेंद्रांमध्ये कोव्हिशिल्ड या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. यात मुंबईतील पालिकेच्या केईएम आणि नायर या नावाजलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना लस देण्याचे काम सुरू आहे. केईएम आणि नायर रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 100 स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. महिन्यानंतर येणाऱ्या स्वयंसेवकांची पुन्हा तपासणी करून त्यात काय निष्कर्ष सापडतात हे पाहिले जाईल आणि त्यानंतर या स्वयंसेवकांना पुढील टप्प्यातील लस द्यायची की नाही हे ठरवले जाईल, अशी माहिती नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या