फुफ्फुसांना मजबूत बनवते गुणकारी तुळस, ‘या’ 5 गोष्टींसोबत घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढेल

थोडेसे चालल्याने, पायऱ्या चढल्या-उतरल्याने किंवा जड काम केल्याने तुम्हाला धाप लागत असेल तर समजून जा की तुमचे फुफ्फुस कमकुवत झालेय. फुफ्फुस कमकुवत झाल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळते. यामुळे ह्रदयविकाराचा धोकाही वाढतो. तसेच कोरोनाचा विषाणूही थेट फुफ्फुसांना आपले लक्ष्य बनवत असल्याने फुफ्फुस मजबूत असणे आवश्यक आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याचे उघड झाले आहे. फुफ्फुसाचे काम शरीरात रक्ताच्या मदतीने ऑक्सिजन पोहोचवणे असते. मात्र फुफ्फुसामध्ये संक्रमण झाल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने जीवही जावू शकतो. त्यामुळे फुफ्फुस निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा. यासाठी बहुगुणी आणि अनेक आजारांवर गुणकारी तुळस हा एक उपाय आहे. यासोबत ज्येष्ठमध, काळे मिरे, दालचिनी आणि लवंग यांचे सेवन केल्यास फायदा होतो.

तुळस

जवळपास प्रत्येकाच्या अंगणात असणाऱ्या तुळशीचे पान, काड्या आणि मंजुळा (फुलं) देखील गुणकारी असतात. यात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॅरोटिन आढळते.

ज्येष्ठमध

बाजारात ज्येष्ठमधच्या काड्या किंवा पावडरही उपलब्ध आहे. यात व्हिटॅमिन बी, ई यासह फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिकॉन, प्रोटिन आणि ग्रिसरायझीक अॅसीड आढळते. तसेच अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणही यात आढळतात.

लवंग

मसाल्याचा पदार्थ असणारी लवंग काढा आणि चहामध्येही वापरली जाते. यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. तसेच व्हिटॅमिन ई, सी, ए आणि डी यांचाही लवंग मोठा स्त्रोत आहे. यासह ओमेगा 3 फॅटी अॅसिडसारखे तत्व देखील यात आढळतात.

दालचिनी

चवीला तिखट-गोड असणारी दालचिनी ही देखील मसाल्यात वापरली जाते. तसेच काही भागात दालचिनीचा चहा देखील मिळतो. दालचिनीमध्ये थायमीन, फॉस्फरस, प्रोटिन, सोडियम, व्हिटामिन, कॅल्शियम, मॅग्नीज, पोटॅशियम, निआसीन, कार्बोहाइडे्ट ही पोषणमुल्य अशतात. तसेच दालचिनी अँडी-ऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे.

काळे मिरे

काळे मिरे अतिशय तिखट असतात. हे अग्निदीपनाचे कार्य करते. यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.

कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले सोपे उपाय, प्रतिकारक क्षमताही होईल मजबूत

असे करा सेवन

फुफ्फुस मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी ज्येष्ठमध, 1-2 काळे मिरे, 1-2 भाजलेल्या लवंग, 4-5 तुळशीचे पान आणि थोडी दालचिनी तोंडात ठेवून चघळावी. तसेच यापासून तुम्ही काढाही बनवू शकता. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल शिवाय फुफ्फुस मजबूत होईल आणि दम्याचा त्रास असेल तर तो देखील कमी होईल.

तुळशीच्या पानांचे फायदे

– रोज सकाळी तुळशीची दोन पाने धऊन चावून चावून खावी. तुळस ही शरीरातील रक्ताभिसरण उत्तम करते.
– तुळशीच्या पानांचा रस भूक वाढवणे, पचन सुधारणे, त्यासोबत पोटदुखी व जंतावर खूप फायदेशीर ठरते.
– हृदयाला बळ देणारी, रक्तशुद्धी करणारी आणि हृदय व किडनी यांच्या बिघाडामुळे आलेल्या सुजेवर चांगले काम करते.
– ज्यांना पोट साफ न होण्याची वारंवार तक्रार असते त्यांनी पाण्यात तुळशीची पाने भिजत ठेवायची. बुळबुळीत
झाल्यावर ती खावीत. यामुळे शौचाला येणारा कडकपणा दूर होतो व जोर न देता पोट मनासारखे समाधानपूर्वक साफ होते. तुळशीचे बी लघवी साफ करते. लघवीतील जळजळ, लघवीतील जंतुसंसर्ग बरा करते.
– सर्दी-खोकला आणि त्यामुळे पाठदुखीसोबत ताप असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधासोबत द्यावा. त्याने कफ कमी होऊन ही लक्षणे बरी होतात.
– तुळस किंवा तुळशीचा कल्प घेतल्यास शरीराला घाम येतो. त्यामुळे त्वचा विकारामध्ये त्याचे सुंदर रिझल्ट बघायला मिळतात.
– तुळशीची पाने आणि मीर पावडर एकत्र वाटून लावली तर कीड मरते आणि गजकर्ण लवकर बरे होते.

निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी टोमॅटो ज्यूस रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

आपली प्रतिक्रिया द्या