कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी एमजीएम रेडिओचा पुढाकार

कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. याकामी लोकशिक्षण आणि लोकप्रसाराचे प्रभावी माध्यम असलेल्या देशातील रेडिओ स्टेशननी महत्वाची भूमिका बजावली आहे. संभाजीनगरात रेडिओ MGM 90.8 FM ने देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. या केंद्रावरून रोज जनजागृतीपर कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. आरोग्य विभागाने दिलेली संभाजीनगर व राज्यातील कोरोनासंदर्भातील माहिती, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या सूचना अथवा निवेदन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन या रेडियो केंद्रावरून प्रसारीत केले जात आहे. याशिवाय एमजीएम मेडिकल कॉलेजच्या आणि सरकारी डॉक्टरांच्या सूचना, साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर व मास्कचा वापर, लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे ही माहितीही दिली जात आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, रेडिओच्या संचालक डॉ. रेखा शेळके, स्टेशन हेड देवाशीष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रॅम हेड मोतीराम पौळ, टेक्निकल हेड विकास भगूरे, रेडिओ जॉकी वैभव, दिव्या, अदनान, अमृता, अस्मिता आणि देवश्री विशेष मेहनत घेऊन काम करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या