गोव्यात कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदीक उपचार करणार

682

अलगीकरण कक्षात असलेले रुग्ण आणि पॉझिटीव्ह रुग्ण यांच्यावर आयुर्वेदीय उपचार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे उपचार करणारे गोवा हे पहिले राज्य असेल. गोव्यामध्ये आयुष विभागामार्फत आयुर्गोवा कोविड-19 या अ‍ॅपचे तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. या अ‍ॅपद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे, याची माहिती जनतेला मिळणार आहे. गोव्यातील लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण करणे आणि या परिस्थितीत आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो , याविषयी माहिती देण्यासाठी आयुर्गोवा कोविड-19 हे अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. आहार कसा असावा आणि जीवनशैली कशी असावी, कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही या अॅपद्वारे करण्यात येणार आहे.गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनच्या 100 हून अधिक वैद्यांनी एकत्र येऊन संघटितपणे या अ‍ॅपपसाठी काम केलं आहे. गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनच्या सचिव वैद्या  स्नेहा प्रणव भागवत यांनी कोरोनाविषयक प्रोटोकॉल आणि अ‍ॅप यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या