कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले सोपे उपाय, प्रतिकारक क्षमताही होईल मजबूत

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे दररोज देशात लाखो लोग संक्रमित होत असून हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. दुसऱ्या लाटेत शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीमध्ये स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे.

अनेक अहवालांमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी प्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. आयुष मंत्रालय देखील सातत्याने याबाबत नागरिकांना जागरुक करत असते. आयुष मंत्रालयाने नुकतेच कोरोनापासून बचावासाठी काही सोपे उपाय सांगितले असून यामुळे तुमचा बचावच होणार नाही तर प्रतिकारक क्षमताही मजबूत होईल..

गरम पाणी

दिवसातून अनेक वेळा गरम किंवा कोमट पाणी प्या. तसेच गरम पाण्यामध्ये थोडे मिठ टाकून त्या पाण्याने दिवसातून एक ते दोन वेळा गुळण्या करा.

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये हळद, जिरे, सुंठ, लसून यासह आवळा याचा समावेश करा. तसेच घरी बनवलेल्या ताज्या जेवणाचेच सेवन करा. रोज एक चमचा चवनप्राशही नक्की घ्या. झोपण्याआधी दुधामध्ये हळद टाकून प्या.

योग आणि प्राणायाम करा

रोज किमान 30 मिनिटं योग आणि प्राणायाम नक्की करा. श्वासोश्वासाचे व्यायाम करा. यामुळे तुमची प्रतिकारक क्षमता वाढेल आणि कोरोनाच नाही तर इतर आजारही दूर राहतील.

Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर

चांगली झोप घ्या

प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आणि शरीर पुन्हा उर्जावान होण्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे.

‘या’ औषधांचे सेवन करा

आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गुळवेलच्या आणि अश्वगंधाच्या गोळ्यांचे दिवसातून दोन वेळा सेवन करा. जेवणानंतर कोमट पाण्यासोबत याचे सेवन करा.

हर्बल टी प्या

दिवसातून किमान दोन वेळा हर्बल टी प्या. हर्बल टी बनवण्यासाठी 150 एमएल पाण्यात तुळस, दालचिनी, सुंठ, काळे मिरे टाकून उकळून घ्या. यानंतर याचे सेवन करा. चवीसाठी यात गुळ किंवा मध टाका.

ऑइल पुलिंग थेरपीचा वापर करा

दिवसातून एकदा ऑइल पुलिंग थेरपीचा वापर करा. यासाठी एक चमचा नारळाचे तेल घ्या आणि 2-3 मिनिटं तोंडात गुळणी केल्यासारखे फिरवा आणि थुंकून टाका. यानंतर कोमट पाण्याने गुळणा कराय. तसेच नाकात तिळ, मोहरीचे तेल नक्की टाका.

#Coronavirus फुफ्फुस मजबूत ठेवायचंय? ‘या’ गोष्टींचे सेवन करणे टाळा

वाफ घ्या

छातीत कफ साठू नये यासाठी वाफ घ्या. यासाठी पाण्यामध्ये पुदिनाची पाने, ओवा किंवा कापूर टाकून वाफ घ्या. वाफ घेताना पाणी जास्त गरम असून नये हे लक्षात ठेवा.

अष्ठमधाचे सेवन करा

खोकला येत असेल किंवा गळ्यात खवखव होत असेल तर लवंग किंवा अष्ठमधाची पावडर मधामध्ये टाकून त्याचे दिवसातून दोनदा सेवन करा.

खजूर जास्त पौष्टिक की खारीक? जाणून घ्या काय आहेत फायदे…

आपली प्रतिक्रिया द्या