आई बाबा आणि आजोबांना कोरोना, एकाकी चिमुकलीवर शिवसेनेची मायेची पाखर

1723

कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबेच अस्वस्थ होत चालली आहेत. मात्र अशा संकटातही माणुसकीचे अनोखे दर्शन घडत आहे. आई-बाबा आणि आजोबांना कोरोना झाल्याने सर्वजण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना, दहा महिन्यांच्या चिमुकलीचे काय करायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या चिमुकलीवर मायेची पाखर घालण्यासाठी शिवसेना पुढे आली असून, तिचा सांभाळ आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या करत आहेत. आई ठणठणीत बरी होईपर्यंत शिवसेना तिचा सांभाळ करणार आहे.

हे कोरोनाग्रस्त कुटुंब वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आई ठाण्यातील रुग्णालयात दाखल आहे. घरातील सगळ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, दहा महिन्याच्या चिमुकलीचा सांभाळ कोणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्या मुलीला आई स्वतः आपल्या सोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. सामाजिक कार्यकर्त्या शिरीन अठावाल यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विट करून ही बाब कळली अठावाल यांनी टिटवाळातील युवा सेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लगेच युवा सेनेचे पालघर विस्तारक राहुल लोंढे यांना ही माहिती दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या चिमुकलीला आधार देण्याचे ठरवले. चिमुकलीला कोरोनापासून वाचवायचे होते, ठाणे पूर्वेतील शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चिमुकलीला सांभाळण्याची तयारी दाखवली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची भेट घेतली आणि काळजी करू नका आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू असा शब्द दिला. दोन वेळा मुलीची कोरोना टेस्ट घेतली ती निगेटिव्ह आल्याने तिचा सांभाळ करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.

खेळणी आणि नवे कपडे
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रिना मुदलियार चिमुकलीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत आहे. तिच्यासाठी नवे कपडे तसेच खेळणी आणली असून थोड्याच वेळात तिथे रुळली देखील आहे. आईने व्हिडिओ कॉलवर आपल्या पोटच्या गोळ्याला आनंदित असल्याचे पाहिले, ती आनंदात असल्याचे पाहिल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव तरळले. ती चिमुकली आता आमच्या परिवाराचा एक भाग बनला असल्याचे राहुल लोंढे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या