Corona Virus बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन बंद

Corona Virus चा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थानांनी मंदिरे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिरही याच अनुषंगाने बंद ठेवण्याता निर्णय घेण्यात आला आहे. योगेश्वरी देवीचे मंदिर हे प्रशासनाच्या सूचनेवरून दिनांक 17 मार्च म्हणजेच मंगळवारपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. योगेश्वरी देवीच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. या भाविकांना जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. योगेश्वरी देवीची दैनंदीन षोडशोपचार पूजा नित्य पुजाऱ्यांमार्फ़त केली जाणार आहेत,मात्र यावेळी देखील भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या