Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर

सध्या जगभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट थैमान घालत आहे. हिंदुस्थानमध्येही दररोज लाखो रुग्ण संक्रमित होत आहे. ज्या लोकांमध्ये पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता नाही किंवा ज्यांना आधीपासून काही आजार आहे त्या व्यक्तींसह तरुण आणि लहान मुलं देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.

कोरोना हा व्हायरल आजार असल्याने काही घरगुती उपाय करूनही तुम्ही स्वत:चे आरोग्य चांगले ठेऊ शकता. आयुर्वेदानुसार यासाठी गुळवेलचे सेवन करणे महत्वाचे आहे. गुळवेलच्या पानांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे सर्दी, कफ यापासून बचाव करता येतो आणि रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.

गुळवेलमधील पोषणमुल्य

गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म तसेच ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. या घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

डेंग्यूवर रामबाण उपाय

गुळवेल डेंग्यू या आजारावर रामबाण उपाय आहे. डेंग्यूची लागण झाल्यावर रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. साधारणत: निरोगी रुग्णाच्या शरीरात दीड लाख ते साडे चार लाखांदरम्यान प्लेटलेट्स असतात. मात्र डेंग्यूची लागण झाल्यावर याची संख्या घटते आणि रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. मात्र गुळवेलच्या सेवनाने शरीरातील रक्त पेशींची संख्या वाढण्यास मदत होते.

मधुमेह

रक्तातील साखर वाढल्याने मधुमेह हा आजार बळावतो. मात्र गुळवेलच्या सेवनाने रक्तातील सारख नियंत्रणात राहते. तसेच यामुळे रक्तदाब आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते.

#Coronavirus फुफ्फुस मजबूत ठेवायचंय? ‘या’ गोष्टींचे सेवन करणे टाळा

त्वचारोग

हाता-पायाला चट्टे पडणे, किंवा आग होणे यासारख्या आजारांवरही गुळवेल प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील. त्वचा मऊ आणि सतेज होईल.

अॅनिमिया

गुळवेलच्या सेवनामुळे अॅनिमिया या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. शुद्ध तूप आणि मध याच्यासह गुळवेल सेवन केल्याने रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होते.

ओवा आणि कापूर हुंगल्याने ऑक्सिजन पातळी वाढते ?

पोटाच्या समस्या

गुळवेल पोटाच्या समस्येवरही फायदेशीर आहे. यामुळे अॅसिडिटी आणि गॅसस्या समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रियाही सुरळीत होते.

(टीप – गुळवेलचे सेवन करण्यापूर्वी वैद्यांचा किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या. कारण कोणतेही औषध जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा आरोग्यवर विपरीत परिणाम होऊ शकतो)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी काय खावं, काय नाही? WHO ने सांगितलं कसा असावा आहार

आपली प्रतिक्रिया द्या