कोरोनाची लागण झालेल्या इंग्ल्ंडच्या पंतप्रधानांची तब्येत बिघडली, ICUत दाखल केले

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने अति दक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्याच आठवड्य़ामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. ही लागण झाल्याचे कळताच त्यांनी 27 मार्च पर्यंत स्वत:ला इतरांपासून विलग केले होते. मात्र 5 एप्रिल रोजी त्यांना लंडनमधल्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 6 एप्रिलच्या संध्याकाळी त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आल्य़ाचे कळाले आहे.

अतिदक्षता विभागात दाखल होण्यापूर्वी जॉन्सन यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात गेलो होतो.काही नियमित चाचण्यांसाठी मी तिथे गेलो होतो. मला अजूनही माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. मी माझ्या संपूर्ण टीमच्या संपर्कात आहे. आम्ही सगळे कोरोनाविरूद्ध लढत असून सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत’


जॉन्सन यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा आणि ते लवकर बरे व्हावेत अशी इंग्लंडचे नागरीक प्रार्थना करत आहेत. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक ट्विट करत ते लवकर बरे व्हावेत अशी सदीच्छा व्यक्त केली आहे. ‘तुम्ही लवकरच रुग्णालयातून बाहेर आलेले आणि ठणठणीत झालेले पाहायचे आहे’ असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या