बुलडाण्यात 13 वर्षांच्या मुलीसह दोघांना कोरोनाची लागण

2830

कोरोनाची लागण झाल्याने आणि इतर व्याधी बळावल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बुलढाणामधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. ही व्यक्ती जिवंत असताना तिच्या संपर्कात आल्याने आणखी दोन जण बाधित झाले आहे. यामध्ये एका वृद्ध महिलेचा आणि 13 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकूण 24 जणांची चाचणी घेण्यात आली होती, त्यातील दोघांना कोरोनोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी ही माहिती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण 9 जणांचा चाचणी अहवाल येणं बाकी असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका नातेवाईकाचाही समावेश आहे. याशिवाय रुग्णालयातीलव 5 कर्मचारी आणि कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय असलेले आणि विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 3 जणांना एकूण 9 जणांमध्ये समावेश आहे.

बुलढाणा शहराच्या आरोग्य तपासणीसाठी चाळीस पथके तैनात
बुलढाण्यातएका व्यक्तीचा कोरोनामुळे मुत्यु झाला आहे तर त्याच्या जवळच्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अजुन नऊ जणांचे अहवाल येणे बाकी असताना पालकमंत्री राजेद्र शिंगणे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद्र पंडीत व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन त्यानी संपूर्ण बुलढाणा शहराची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी आरोग्य विभागाची 40 पथके तैनात करण्यात आली आहे व आरोग्य तपासणी सुरू झाली आहे. कोरोनाच्या बुलढाणा शहरात वाढता प्रभाव पाहता जनता भयभीत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या