चीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

5865
प्रातिनिधिक फोटो

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. साडेआठ लाखांहुन अधिक रुग्ण आणि 42 हजार पेक्षा जास्त मृत्यू या व्हायरसमुळे झाले आहेत. याच कोरोना व्हायरसवर उपाय शोधण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळा, वैज्ञानिक कार्य करत आहेत. तसेच अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सारख्या संस्था या व्हायरसबाबत सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातील अनेक प्रसारमाध्यमे आणि सरकारी संस्था युनिव्हर्सिटीने गोळा केलेली माहिती ग्राह्य धरून त्याचा वापर करत आहे.

युनिव्हर्सिटीच्या मतानुसार, कोरोना व्हायरस जगातील 180 देशांमध्ये पसरला आहे. मात्र असेही काही देश आहेत जिथे अद्यापही या व्हायरसचा शिरकाव झालेला नाही आणि एकही प्रकरण समोर आलेले नाही. या देशांमध्ये चीनच्या शेजारील राष्ट्र उत्तर कोरियाचा देखील समावेश आहे. उत्तर कोरियाचा तानाशह किम जोंग उन प्रशासनाने देशात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण नसल्याचे म्हंटले आहे. विशेष म्हणजे या देशाच्या सीमा चीन आणि दक्षिण कोरिया या देशाला लागून आहेत. या दोन्ही देशात कोरोनाचा कहर दिसत आहे.

आफ्रिकन खंडातील काही देश…
युनिव्हर्सिटीच्या 31 मार्च पर्यंतच्या आकडेवारीनुसार आफ्रिकन खंडातील काही देश अद्यापही या व्हायरसच्या विळख्यात अडकलेले नाही. बोत्सवाना, तुर्कमेनिस्तान, तजाकिस्तान, यमन, कोमोरोस, मलावी, साओ तोमे एंड प्रिंसिपी, दक्षिण सूडान हे असे काही देश आहेत जिथे कोविड-19 चे एकही प्रकरण समोर आले नाही. सोलोमन आइसलँड, वानूआतूसारखे आयलँडही संक्रमनापासून वाचले आहेत.

मृतांचा आकडा 42 हजारहुन अधिक
दरम्यान जगभरात 860,106 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले असून 42,334 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली, चीन, फ्रांस, इराण आणि स्पेन रा देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत पावणे दोन लाख आणि इटलीत सव्वा लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून येथे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या