कोरोना चीनमध्ये तयार केला नसल्याचा WHO च्या डॉक्टरांचा दावा

1980
who

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO च्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख असलेल्या डॉक्टर मायकल रायन यांनी सांगितले की WHO ला पूर्ण खात्री आहे की कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. हे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाच्या अगदी उलट आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की हा विषाणू चीनने प्रयोगशाळेत बनवला असून त्यांच्याकडे याबाबतचे अनेक पुरावे आहेत.

ही बातमी वाचलीत का? – WHO ला लाज वाटली पाहिजे! भडकलेल्या ट्रम्प यांची चीनसह आरोग्य संघटनेवरही पुन्हा टीका

रायन यांनी या विषाणूबाबात बोलताना सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने अनेक तज्ज्ञांशी वारंवार सल्लामसलत केली होती. या सगळ्यांनी विषाणूची गुणसूत्रांची साखळी तपासली आहेत. हे पाहिल्यानंतर हा विषाणी नैसर्गिकरित्या तयार झाला असल्याची या सगळ्यांना खात्री पटली आहे. रायन पुढे बोलताना म्हणाले की या विषाणूला बळ कोणामुळे मिळालं ( HOST) हे शोधणं गरजेचं आहे. ते कळाल्यास या विषाणूबाबत अधिक माहिती मिळेल आणि भविष्यात त्याचा धोका टाळता येईल.

ही बातमी वाचलीत का? – किंमत चुकवायला तयार रहा, अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात उतरले

ट्रम्प यांची चीनवर आगपाखड सुरूच
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना छातीठोकपणे दावा केला होता की हा विषाणू चीनने प्रयोगशाळेतच बनवलेला आहे. त्यांनी या विषाणूला कोरोना म्हणण्याऐवजी सातत्याने चायनीज विषाणू म्हणणं पसंत केलं आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरही या निमित्ताने सातत्याने टीका केली आहे. ही संघटना चीनची बाजू घेत असल्याचा आरोप करत अमेरिकेकडून या संघटनेला दिला जाणारा निधी कमी केला होता. ट्रम्प यांनी म्हटलंय की चीनमुळेच अमेरिकेची अवस्था इतकी खराब झाली आहे. बऱ्याच वैज्ञानिकांच्या मते कोरोना विषाणू जीनमधल्या प्राण्यांच्या बाजारातून उत्पन्न झाला आहे. मात्र कोणत्या जनावरामुळे तो पसरला आहे हे अजून कळालेलं नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या