‘ती’ कोरोनाग्रस्त मृत महिला बदलापूरची नव्हे तर मुलुंडची

445

बदलापूर पर्व येथील नवदुर्ग आश्रम येथे वास्तव्यास असलेल्या 75 वर्षीय उर्मिला यशवंत वैद्य यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि पालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मात्र प्रशासनाने संपूर्ण चौकशी केली असता सदर महिलेला 20 मार्च पूर्वीच मुलुंडच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्या खाजगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णाचा संपर्क आल्याने महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिलेला मधुमेह,उच्च रक्तदाब,मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर आदी आजार होते.

महिलेचा मुलगा हा मुलुंड येथे राहत आहे. बदलापुरात अजूनही कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही तरी सर्व ठिकाणी नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देत असून नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे असे पालिका आरोग्य अधिकारी डॉ अंकुश यांनी सांगितले. नागरिकांनी शहरात कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका. कोरोनाचा एकही रुग्ण बदलापुरात अद्याप मिळालेला नसून चुकीच्या माहितीचा संदेश सोशल मिडीयावर पसरवू नका असे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या