कोरोनाविरुद्ध युद्धात हिंदुस्थानला मोठे यश, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली दिलासादायक माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध युद्धात हिंदुस्थानला मोठे यश मिळाले आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा प्रमाण आता 1.50 टक्क्यांवर आले आहे. 22 मार्च नंतर पहिल्यांदाच मृत्युदर एवढा खाली आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस घटत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील घटत असून याचे श्रेय रुग्णालय कर्मचारी, आणि आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशच्या प्रयत्नांना जाते, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने म्हटले.

14 राज्यात मृत्युदर 1 टक्क्यांहून कमी

राजस्थान, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओडिशा, आसाम आणि केरळसह 14 राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोनाचा मृत्युदर 1 टक्क्यांहून कमी आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

मृत्युदर कमी होतोय

गेल्या 24 तासात देशात 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थान जगातील सर्वात कमी मृत्युदर असणारा देश आहे. 22 मार्च नंतर पहिल्यांदाच मृत्यूदर कमी होत आहे. याआधी 4 मे रोजी देशातील मृत्यूदर 3.23 टक्के होता.

आपली प्रतिक्रिया द्या