जिल्हातील 8 धार्मिक संस्थानांतर्फे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीस 30 लाखाची मदत

799

कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मंदिर, मठ आणि धार्मिक संस्थानांतर्फे पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीस एकुण 30 लाख 4 हजार रूपये आर्थिक मदत आणि 75 हजार रूपायांचे मदत साहित्य देण्यात आले. जिल्ह्यातील धार्मिक संस्थानांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व इतर मदत करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी केले होते. या आवाहनानंतर जसवंतसिंहपुरा येथील श्रीराम मंदिर मठ व बालाजी ट्रस्टच्या वतीने मदतनिधी जमा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, सरचिटणीस दयाराम बसैय्ये व धर्मादाय निरिक्षक अजित पाटील यांनी ही मदत गोळा केली.

श्रीक्षेत्र वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरातर्फे 11 लाख 2 हजार, रत्नपूरच्या भद्रा मारोती मंदिरातर्फे 10 लाख रूपये, लासूर स्टेशन येथील देवी दाक्षायणी मंदिरातर्फे 2 लाख रूपये, गारखेडा येथील गजानन महाराज मंदिरातर्फे 2 लाख रूपये, समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरातर्फे 2 लाख रूपये, श्रीराम मंदिर मठ व बालाजी ट्रस्टतर्फे 1 लाख 2 हजार रूपये, संभाजीपेठेतील एकनाथ मंदिरतर्फे 1 लाख व सराला बेट येथील श्री गंगागिरी महाराज संस्थान यांच्यातर्फे 1 लाख अशी एकुण 30 लाख 4 हजार रूपये मदत गोळा करण्यात आली. ही रक्कम पंतप्रधान मदत निधी व मुख्यमंत्री मदत निधी यांना एकुण रकमेतून प्रत्येकी 50-50 टक्के रक्कम मदत निधी म्हणून देण्यात आली आहे. तसेच या सर्व धार्मिक संस्थानांतर्फे 75 हजार रूपयाचे साहित्य मदत म्हणून देण्यात आले आहे, अशी माहिती मानसिंग पवार आणि दयाराम बसैय्ये यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या