चीनमध्ये होणारा 2021 चा फिफा फुटबॉल विश्वचषकही धोक्यात

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनापाठोपाठ आता चीनमध्ये 2021 मध्ये होणाऱ्या नियोजित फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजनही धोक्यात आणले आहे.फीफा अध्यक्ष जियानी इनफेन्टिनो यासंदर्भात लवकरच चीन सरकार आणि चिनी फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रकोपामुळे फिफाने याआधीच युरो 2020 चषक आणि कोप्पा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा 1 वर्षासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे चीनसह जगातील कोरोनाची महामारी पाहता फिफा चीनच्या यजमानपदाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंक आहे. आशियाई क्रीडा सुपरपॉवर मानल्या गेलेल्या चीनला प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे .ही स्पर्धा 2021 च्या जून- जुलै महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.मात्र याचा काळात पुढे ढकलण्यात आलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची पूर्वतयारी केली जाणार आहे. त्यामुळे चीनमधील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलणे हा एक पर्याय ठरू शकतो असे फिफाचे बॉस इनफेन्टिनो यांचे म्हणणे आहे

आपली प्रतिक्रिया द्या