सेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का ? वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत

हिंदुस्थानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढून 28 झाली आहे. यामध्ये इटलीहून आलेल्या 17 पर्यटकांचाही समावेश आहे. कोरोना व्हायरस हा मानवाच्या केसाच्या 900 पट बारीक असतो. इतका बारीक असल्याने तो मानवाच्या शरीरात सहजपणे प्रवेश करू शकतो. या आजाराची लागण नेमकी कशी होते याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.

आजारी व्यक्तीच्या आसपास आल्याने हा आजार होतो ?
डॉक्टरांच्या मते जर आजारी माणसाच्या आसपास आलात तर पुढील चार गोष्टी असा आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • तुम्ही त्या व्यक्तिच्या किती जवळ जाता
  • ती व्यक्ति शिंकली किंवा खोकली आणि त्याचे शिंतोडे तुमच्या अंगावर उडाले आहेत का ?
  • तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हात फिरवला आहे का ?
  • तुमची रोगप्रतिकारशक्ती किती आहे ?

मग प्रश्न पडतो की आजारी व्यक्तीपासून तुमचे अंतर किती लांब असावे ? याचंही डॉक्टरांनी उत्तर दिलं असून तुम्ही रुग्णापासून 3 फूट अंतर राखणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे एक प्रवक्ते ख्रिश्चिअन लिंडमेअर यांनीही ही बाब सांगितली आहे. मात्र आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते रुग्णापासून 6 फूट अंतर राखणं गरजेचं आहे. तुम्ही रुग्णाच्या कितीवेळा संपर्कात येता यावरही तुम्हाला या आजाराची लागण होील की नाही हे अवलंबून असतं.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. आजारी माणसाने स्पर्श केलेल्या गोष्टींशी संपर्क झाल्याने या आजाराची लागण होण्याची हमखास शक्यता असते. हाँगकाँगमधल्या एका आरोग्य संस्थेने दावा केला आहे की तिथल्या बुद्ध मंदिरात अनेक भाविक याच कारणामुळे आजारी पडले आहेत. हेच कारण आहे की ज्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला वेगळं ठवलं जातं.

जागतिक आरोग्य संस्थेने हा आजार सेक्स केल्याने होतो किंवा नाही याचेही उत्तर दिले आहे. हा संभोगामुळे संक्रमित होणारा आजार नसल्याने त्याद्वारे या आजाराची लागण होऊ शकत नाही. मात्र चुंबन घेतल्याने या आजाराची लागण नक्की होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या