जयसिंगपुरातील मगदूम आयुर्वेदीक महाविद्यालयातील विलगीकरण विभाग सज्ज

326

जयसिंगपूरमधल्या डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेदीक महाविद्यालयात 50 खाटांची सोय असलेला विलगीकरण विभाग सज्ज झाला आहे. या विभागाला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. जयसिंगपूर मेडिकल असोशिएशन, तसेच  इंडियन मेडीकल असोशिएशन जयसिंगपूरचे सर्व पदाधिकारी या विभागाला सेवा देणार आहेत. या आयुर्वेदीक महाविद्यालयाचा नर्सिंग स्टाफ या विलगीकरण विभागात काम करणार आहे. हा विभाग सुरु करण्यासाठी जयसिंगपूर नगरपरिषदेनेदेखील सहकार्य केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या