ऋषी कपूर यांचे कनिकाप्रेम, गुन्हा दाखल होताच ‘कपुरांची वेळ खराब’ असल्याचे ट्विट

6855

बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली. लंडनवरून आल्यावर कनिका हिने कानपुर आणि लखनौ येथे पार्टी केली आणि तिच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यताही आहे. यामुळे तिच्यावर उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कपुरांची वेळ खराब असल्याचे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.

कनिका कपूर आणि येस बँकेचे फाउंडर व माजी संचालक राणा कपूर यांचा फोटो ऋषी कपूर यांनी शेअर केला आहे. या फोटोसोबत ऋषी कपूर यांनी आपली भीती व्यक्त करत म्हंटले की, ‘आजकाल काही कपूर लोकांचा वेळ खराब सुरू आहे. दुसऱ्या कपुरांची रक्षा करा, कोणतेही वाईट काम होऊ नये. जय माता दी.’

screenshot_2020-03-21-17-05-07-590_com-android-chrome

हॉटेल ताजवर सवाल
कनिका कपूर 9 मार्चला लंडनवरून आली आणि दिल्ली विमानतळावरून कोणतीही तपासणी न करता सटकली. यानंतर ती लखनौ येथील हॉटेल ताजमध्ये थांबली. येथे एका पार्टीत ती सहभागी झाली. ऋषी कपूर यांनी विमानतळावर तपासणीत झालेल्या चुकीवर खापर फोडले आणि हॉटेल ताजवरही निशाणा साधला. ‘असे समजू की तो दिल्ली विमानतळावरून पळाली, परंतु ताज सारख्या प्रतिष्ठित आणि मोठ्या हॉटेलमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांच्या तपासणीची काहीच सोय नाही? ताज एक मोठे नाव आहे. ते बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी करून निश्चितच विषाणूचा शोध लावू शकतात, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.

screenshot_2020-03-21-17-05-26-263_com-android-chrome

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये हॉटेलने याची माहिती प्रसारमाध्यमे आणि सरकारला द्यावी असे आवाहन केले. मी सर्व पाहुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेल ताजने उचलले पावलांचे कौतुक करतो. परंतु बाहेरून येणाऱ्यांची माहिती मीडिया आणि सरकारला द्या.

screenshot_2020-03-21-17-05-43-342_com-android-chrome

कनिकाचे प्रकरण काय?
रागिणी एमएमएस या चित्रपटात गायलेल्या ‘बेबी डॉल’ गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका कनिका कपूर सध्या सर्वांच्या निशाण्यावर आहे. लंडनवरून आल्यावर तिने स्वतःला क्वारंटाईन केले नाही. विविध लोकांच्या संपर्कात आली. मात्र तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले. सध्या तिला लखनौच्या केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या