Corona virus update- महाराष्ट्रात रुग्णाचा आकडा 416 वर; 19 जणांचा मृत्यू

हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढायला लागली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 1834 च्या पार पोहोचला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरात या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना शोधण्याचे व क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील देखील अडीचशेहून अधिक जण या मरकजमध्ये सामिल झाले होते असे समजते.

 • नवी मुंबई –  एका दिवसात 9 कोरोना रूग्णांची वाढ. शहरात एकूण 22 कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण. वाशी, नेरूळ, कोपरखैरणेचा समावेश.
 • इस्रोने पीएम केअर फंड मध्ये 5 कोटी दिले

 • नालासोपारा पश्चिमेकडील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू
 • वसईत करोनाचा पहिला बळी
 • महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 81 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 416 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • गेवराईत संदीप मुळे यांच्या पुढाकारातून पालातुन‌ गरजूंना खिचडीचे वाटप
 • गेवराई – वाढदिवस रद्द करून तरुणाने केले 200 गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाट; 50 तरुणांचे रक्तदान
 • देशात कोरोना बाधितांची संख्या 1965 वर
 • दीड कोटी कोरोना प्रोटेक्शन सूटची ऑर्डर दिली आहे – आरोग्य मंत्रालय
 • गेल्या 24 तासात देशात 328 कोरोनाग्रस्त आढळले, 12 जणांचा मृत्यू
 • कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 15 तर जिल्हा रुग्णालयात 3 संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
 • या 1400 जणांपैकी 1300 जण सापडले असून त्यांची चाचणी करण्यात आली आहे
 •  दिल्लीतील मरकजला महाराष्ट्रातील 1400 हून अधिक जण उपस्थित – राजेश टोपे
 • महाराष्ट्रातील शेल्टर होममध्ये तब्बल सव्वातीन लाख मजूर
 • या मजूरांना आपल्याला इथेच थांबवायचे आहे. कारण राष्ट्रहितासाठी हे महत्त्वाचे आहे.
 • सर्व मजूरांची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
 • दुसऱ्या राज्यातील कामगार जे इथे अडकले आहेत त्यांच्या सर्व सोयी केल्या जातील
 • आशा वर्करलाही ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाणार आहे
 • कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण तयार असलं पाहिजे.त्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग दिले जात आहे.
 • सर्व जिल्ह्यात कोविड १९ साठी विशेष रुग्णालय तयार करत आहोत – राजेश टोपे
 • रॅपिड टेस्टसाठी स्वॉब ऐवजी रक्ताची तपासणी करणार
 • रॅपिड टेस्ट करण्याला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे जास्तित जास्त चाचण्या होतील. या टेस्टिंगच्या माध्यमातून 5 मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार आहे,
 • हॉटस्पॉट कडे अधिक लक्ष दिलं जात आहे – राजेश टोपे
 • कोरोना ही युद्धापेक्षाही मोठी समस्या – राजेश टोपे
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगवर चर्चा
 • तेलंगणात क्वारंटाईनमध्ये असलेल्या मुस्लिमांनी एकत्र येऊन पढला नमाज

 • धारावीत कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला, बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फेसबुकवर लाईव्ह येऊन जनतेचे प्रश्न जाणून घेत आहेत

   • आंध्र प्रदेशमध्ये 21 नवे रुग्ण आढळले, आकडा 131 वर
   • दिल्लीतील रुग्णालयांमध्ये 700 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची शक्यता

   • गुजरातमध्ये 52 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

   • चेंबूरमधील साई रुग्णालयातील रुग्णालय पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तर हिंदुजा, जसलोक, सैफी, भाभा रुग्णालयातील काही भाग सील केला.

   • देशातील मृतांचा आकडा 50 वर
   •  गेल्या 12 तासात 131 कोरोनाचे रुग्ण आढळले, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1965 वर

   • महाराष्ट्रात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले, कोरोनाग्रस्तांचा आकडा 338 वर

   • राजस्थामध्ये एकाच व्यक्तीमुळे 17 जणांना कोरोनाची लागण

   • फ्रान्समध्ये एकाच दिवसात 509 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 4032 वर
   • मुंबईतील भायखळा बाजारात सोशळ डिस्टंसिंगला फाट्यावर मारत लोकांनी गर्दी केली

   • सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 1048 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये
   • इंदूरमध्ये 12 कोरोनाग्रस्त आढळले, मध्य प्रदेशचा आकडा 98 वर

   • दिल्लीतील मरकजला गेलेल्या सोलापूरातील 25 जणांसह 31 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह
   • हे व्हेंटिलेटर 50 हजार रुपयांत उपलब्ध होणार
   • पुण्यातील NOCCO रोबोटिक्स कंपनीचे इंजिनिअर तयार करणार स्वस्त व्हेंटिलेटर

   • अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे सहा आठवड्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

   • मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका वस्तीत स्क्रिनिंग करायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक, व्हिडीओ व्हायरल

  • हिंदुस्थानातील कोरोना ग्रस्तांची संख्या 1834, मृतांचा आकडा 41 वर
  • गेल्या 24 तासात हिंदुस्थानात 437 कोरोनाग्रस्त आढळले
  • अमेरिकेत गेल्या 24 तासात 884 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
आपली प्रतिक्रिया द्या