Corona effect – दर्शकांना ‘या’ मालिका पुन्हा पहायच्या आहेत

1937

कोरोना प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि इंटरनेट वर आपला वेळ व्यतीत करत आहे. 21 दिवसांचा काळ हा मोठा काळ आहे. त्यामुळे अशा काळात लोकांनी प्रसार भारतीकडे जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्याची मागणी केली आहे. रामायण आणि महाभारत या दोन मालिकांसाठी देशभरातून मागणी वाढली आहे.

बुधवारी 25 मार्च रोजी प्रसार भारतीचे सीईओ शशि शेखर यांनी सांगितले की, लोकांच्या मागणीचा विचार करून आम्ही या मालिकांचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याशी संपर्क करतो आहोत. पत्रकाराच्या ट्विटर हँडलवर त्यांनी ही माहिती टॅग केली आहे. मात्र त्यानंतर लोकांनी शक्तिमान, विक्रमवेताळ, चाणक्य या मालिकांची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या