या माजी खासदाराची प्रेम कहाणी फुल्ल फिल्मी आहे, वाचाल तर तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

2710

अनेक राजकारण्यांचा संघर्ष हा इतरांसाठी प्रेरणादायी असतो. वैयक्तिक जीवनात असंख्य अडचणींवर मात करून लोकांसाठी झटणारे नेते हे कायम स्मरणात राहतात. एका माजी खासदाराने त्याच्या आयुष्यातील संघर्षाचं पान लोकांसमोर खुलं केलं आहे. ज्या दिवशी त्यांचं लग्न होतं त्या दिवशीही सकाळी त्यांना कामावर जावं लागलं होतं. इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केल्याने सकाळी उठून ते पहिले ग्राहकांकडे गेले होते. त्यांना माल दिला, मिळकतीचे पैसे घेतले आणि दुपारनंतर ते स्वत:च्या लग्नासाठी गेले. हा नेमका प्रसंग काय होता आणि लग्नाच्या दिवशी आणखी काय घडले ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या आय़ुष्यातील कडूगोड आठवणींना एका फेसबुक पोस्टच्याद्वारे उजाळा दिला आहे. त्यांच्या लग्नाच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे त्यांनी सांगितले आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात की “आज आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली, 2 एप्रिल 1980 रोजी आमचं लग्न दादर च्या ब्रॉडवे शॉपिंग सेंटर च्या टेरेस वर संध्याकाळी 6 वाजता लागलं, त्यावेळेस मी घाटकोपर च्या जगडुशा नगर येथील एका सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो, नुकताच वर्षा दीड वर्षांपूर्वी मी माझा इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्टस चा व्यवसाय चालू केला होता. लग्न संध्याकाळी असल्यामुळे आणि दिवसभरात टिळा साखरपुडा मिरवणूक घोडी डीजे काहीच नसल्यामुळे मी सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे बिझिनेस व्हिजिट साठी अंधेरी विक्रोळी आणि घाटकोपर येथे 4-5 कस्टमर्सकडे जाऊन स्पेअर पार्टस ची डिलीव्हरी, पेमेंट कलेक्शन करून दुपारी बँकेत जाऊन आलो, घरी गेलो आणि तयार होऊन टॅक्सी करून दादर ला स्वतःच्या लग्नासाठी गेलो”

adhalrao-resize

लग्नाच्या दिवसाची आठवण सांगताना त्यांनी पुढे लिहिलं आहे की “लग्नाला मोजून 80-90 लोकं होती , ती सुद्धा माझ्या इलेक्ट्रॉनिक मार्केट मधली. तसेच सौ.च्या बहिणी आणि मैत्रिणी, माझे मुंबईतील मित्र, कारण आमचा प्रेमविवाह असल्यामुळे आमच्या दोघांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते, लग्न लागल्यानंतर रिसेप्शन संपता संपता माझे आई वडील आम्हाला आशीर्वाद द्यायला आले होते, लॉकडाउनमुळे निवांत आहे म्हणून आज मला सहज 40 वर्षांपूर्वीच्या आजच्या दिवसाची आठवण झाली म्हणून आपल्याशी मी ही मजेशीर आठवण शेअर करतोय”

आज आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली, 2 एप्रिल 1980 रोजी आमचं लग्न दादर च्या ब्रॉडवे शॉपिंग सेंटर च्या टेरेस वर संध्याकाळी 6…

Posted by Shivajirao Adhalrao Patil on Wednesday, April 1, 2020

आपली प्रतिक्रिया द्या