आंबा वाहतुकीच्या नावाखाली प्रवासी वाहतूक, एकाविरूद्ध गुन्हा दाखल

731

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा माल वाहतुकीच्या नावाखाली प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. या तक्रारी पाहता पोलिसांनी गाड्य़ांची तपासणी अधिक कडक केली होती. या तपासणीदरम्यान त्यांना या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी एक गाडी जप्त केली असून या गाडीसाठीआंबा वाहतूक करण्यासाठीचा परवाना काढण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्यातून प्रवासी वाहतूक केली जात होती.

कोरोना फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीलाच परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. याचा फायदा उचलत काहींनी आंब्याची वाहतूक करण्याच्या नावाखाली प्रवासी वाहतूक करायला सुरुवात केली आहे. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. तपासणीदरम्यान पोलिसांनी महिंद्रची एक पिकअप गाडी थांबवली. या वाहनातून चालकाने मुंबईतील त्याचे 4 नातेवाईक आणल्याचं पोलिसांना कळालं. या सगळ्यांना गढीताम्हणे या गावात सोडण्यात येणार होते. पोलिसांनी या प्रकरणी काशीराम बाबू भांडये याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवगड पोलिसांनी महिंद्र कंपनीची गाडीही जप्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या