दारूची दुकाने उघडा, मेघालयच्या भाजप प्रदेशाध्यक्षांची मागणी

933
liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

मेघालय भाजपचे अध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी त्यांच्या राज्यातील दारूची दुकाने सुरू करावीत अशी मागणी केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रेड संगमा यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. मावरी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी असे म्हटले आहे.

मावरी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की दारू पिणे हे मेघालयमधल्या जनतेसाठी जगण्याचा एक पद्धत आहे. त्यामुळे दारूविक्रीला पुन्हा सुरुवात करण्यात यावी. मावरी हे खासी हिल्स वाईन डीलर्स आणि कल्याण महासंघाचे अध्यक्ष आहेत. या महासंघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मुख्यमंत्र्य़ांकडे ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की दारूच्या दुकानधारकांवर ग्राहकांकडून दारू विक्रीला सुरुवात करावी यासाठी प्रचंड दबाव येत आहे. मेघालयचे रहिवासी हे नियंत्रित स्वरुपात दारु पितात. त्यांचा विचार करून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांप्रमाणे दारूची दुकानेही सुरू ठेवावीत असे मावरी यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानच्या वैद्यकीय महासंघाच्या तक्रारीनंतर गुरुवारपासून मेघालयमधील दारुची घरपोच सेवा बंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या