गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवले

3330

देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह 23 जण हे महाबळेश्वरला गेल्याची बाब उजेडात आली आहे. या प्रवासासाठी त्यांना राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. वाधवान हे आपले कौटुंबिक मित्र असून त्यांना व त्यांच्यासोबत असलेल्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी असा उल्लेख असलेले अमिताभ गुप्ता यांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या