corona virus update – 67 जणांना कोरोनाची लागण, राज्यातील कोरोनग्रस्तांची संख्या 490 वर

4004

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हिंदुस्थानात अडीज हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण जगाबाबत बोलायचे झाल्यास कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 10 लाखांच्या पलिकडे गेला आहे. जगभरात 52 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये 24 तासात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. तिथे गुरुवारी 1169 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • आज राज्यात 67 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 490 वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 • कर्नाटकमध्ये एकत्र नमाज पढायला आलेल्यांनी पोलिसांवर दगडफेक केली
 • मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाचे सचिव विजय कुमार यांना कोरोनाची लागण

 • गेल्या 24 तासात कोरोना बाधितांचा आकडा 478 ने वाढला
 • देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजाराच्या पार
 • पनवेलमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 15 वर
 • निजामुद्दीन मरकजमधील तबलिगी आणि त्यांच्या संपर्कातले 14 राज्यात 647 जण कोरोनाबाधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती
 • याआधी 5 जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  CISF चे आता एकूण 11 जवान हे कोरोना बाधित झाले आहेत
 • पनवेलमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाचे 6 जवान कोरोनाग्रस्त
 • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह, जिल्हा कोरोनामुक्त – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
 • अद्याप 19 जणांचा शोध सुरू आहे – तुकाराम मुंढे
 • नागपूरात तबलिकी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या 189 जणांना क्वारंटाईन केलं आहे.

 • मध्य प्रदेशात आणखी दहा जणांना कोरोनाची लागण
 • धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनवर
 • दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 384 वर
 • तामिळनाडूतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 411 वर, गेल्या 24 तासात आढळले 101 रुग्ण
 • नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने हमाल व माथाडी कामगारांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप

nagar-krushi

 • जळगावात जैन इरिगेशनतर्फे 1 लाख घरांपर्यंत कोरोना माहिती पुस्तिकेचे वितरण सुरु

jalgaon-book

 • पाचोरा पिपल्स बॅंकेतर्फे 2500 गरजु कुटुंबाला किराणा वाटप

pachora-bank

 • गेल्या 24 तासात 336 कोरोनाग्रस्त आढळले
 • मरकजमध्ये गेलेले 664 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.
 • गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही जण हे तबलिकी जमातमधील आहेत – आरोग्य मंत्रालय
 • गुरुवारी कोरोनाच्या 8000 सॅम्पल्सची चाचणी झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे
 • 300 परदेशी जे त्यांच्या देशात परतले आहेत त्यांनाही ब्लॅक लिस्ट केले जाणार – गृहमंत्रालय
 • तबलिक जमातमधील 900 परदेशीं जे आता हिंदुस्थानात आहेत त्यांना ब्लॅक लिस्ट केले आहे. – गृहमंत्रालय
 • गेल्या 24 तासात तीस लाख लोकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलं आहे – आरोग्य मंत्रालय
 • राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 161 वर
 • आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाने घेतला पहिला बळी, 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 •  तीस हजारहून अधिक निवृत्त डॉक्टर कोरोना विरोधातील लढ्यात उतरणार

 • तामिळनाडूतील रुग्णालयांमध्ये रोबोट देणार कोरोनाग्रस्तांना जेवण आणि औषधं

   • पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले नगरमधील नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
   • खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी 1 कोटी रूपयांच्या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे
   • कोपरगावात काळ्याबाजारासाठी साठा केलेला तांदूळ पकडला; चार जणांवर कारवाई
   • जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिपंळगाव कोलते ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक दिवशी फवारणी केली जात आहे.
   • उत्तर प्रदेशमध्ये एकाच दिवसात 172 कोरोनाग्रस्त आढळले

   • नगर जिल्ह्यात आढळलेल्या दुसऱ्या कोरोना बाधित  रुग्णाचा 14 दिवसानंतरचा अहवाल निगेटीव्ह.
   • देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2310, मृतांचा आकडा 56 वर

   •  आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण आढळले, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 161 वर
   • तंदुरुस्त राहून मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी पहाटेच्या वेळी योगाचे धडे देण्याच्या जिल्हाधीकाऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक…

कळंबच्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक, पकडलेले कामगारही उपक्रमांवर खूष

https://bit.ly/3dTg5Ta

     बुलढाणाा- प्रतिक्षेत असलेले 3 रिपोर्ट निगेटिव्ह !

बुलढाणाा शहरात कोरोना संक्रमीतांची संख्या 5

   • घरातील बाल्कनी, दारात उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हा
   • या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी रस्त्यावर उतरू नये, गर्दी करू नये
   • कोरोनाविरोधातील लढाईत आपण एकटे नाही तर संपूर्ण देश यात उतरला आहे हे दाखवण्यासाठी यात सहभागी व्हा
   • आपण एकाच उद्देशाने लढतोय हे दाखवण्यासाठी यात सहभागी व्हा
   • घराबाहेर उभे राहून मेणबत्ती, दिवा पेटवावा अथवा मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू करावा
   • 5 एप्रिलला म्हणजे रविवारी जनतेने रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील सगळे लाईट बंद करावेत
   • पंतप्रधानांच्या मुद्रीत केलेल्या संदेशाचे प्रसारण, पाहा व्हिडीओ

   • दिल्लीतील निजामुद्दीन मरकजबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली, पिंपरीत एकाविरोधात गुन्हा दाखल
   • मुंबईतील धारावीमध्ये आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला, डॉक्टरला झाली कोरोनाची लागण

   • त्यांच्याच चित्रपटातील गाण्याचे बोल बच्चन यांनी या फोटोला कॅप्शन म्हणून दिले आहेत

   • अमिताभ बच्चन यांनी एका ट्विटरद्वारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले
   • डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या 7 जणांना अटक केली, इतर आरोपींची ओळख पटवून त्यांनाही अटक होणार

   • इंदूरमध्ये चाचणीसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकावर दगडफेक आणि हल्ला करणाऱ्यांच्या धरपकडीला सुरुवात
   • अमेरिकेत 24 तासात 1169 जणांचा मृत्यू

   • अमेरिकेत सगळ्यांना मास्क घालण्याची विनंती करण्यात आली
   • सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता

  • सकाळी 9 वाजता त्यांचा संदेश प्रसारीत केला जाणार आहे
  • हे संभाषण ध्वनिमुद्रीत करण्यात आलेले आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाच्या नावे एक संभाषण जारी करणार
आपली प्रतिक्रिया द्या