मुंबईत 24 तासांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, एकाचा मृत्यू

मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. आज दिवसभरात 852 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. मुंबईत मंगळवारी 479 रुग्ण सापडले होते तर एकही मृत्यू झाला नव्हता.

मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून मंगळवारच्या तुलनेत आज रुग्ण दुपटीने वाढले. 852 रुग्णांपैकी 816 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 36 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 12 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 433 जण कोरोनामुक्त झाले.

सक्रिय रुग्ण 400 ने वाढले

मुंबईत कोरोनाची रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र, त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्याही 400 ने वाढली आहे. मुंबईत मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 127 होती तर आज सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 545 वर पोहोचली आहे.

राज्यात 1847 रुग्ण

राज्यात आज दिवसभरात 1 हजार 847 रुग्ण सापडले तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 840 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 889 वर पोहोचली आहे.