मुंबईत 1276 नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू, कोरोनामुक्तांचा आकडा 17 हजार 472 वर

667

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1276 नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 43 हजार 262 झाली असून मृतांचा आकडा 1417 वर पोहोचला आहे. मात्र एकाच दिवसांत 259 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा 17 हजार 472 वर पोहोचला आहे.

मुंबईत मृत झालेल्या 49 रुग्णांमध्ये 27 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे. यातील 27 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त, 20 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान होते तर दोघांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. मृतांमधील 36 जणांना काही दीर्घकालीन आजार होते अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, चक्रीवादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर इतर आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही आजारांसह तापाकडे दुर्लक्ष करू नये आणि स्वत:हून औषधोपचार घेऊ नयेत असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शिवाय परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या