चड्डीत राहायचं! चीनने पाकिस्तानला दिले N95 मास्क ऐवजी अंडरवेअरचे मास्क

8981

आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने पाकिस्तानची तळी उचलून धरणाऱ्या चीनने संकटाच्या समयी गंडवलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पाकिस्तानला चांगल्या दर्जाच्या N95 मास्कची गरज आहे. चीनने दिलदारपणाचा आव आणत त्यांना मास्कचा पुरवठा केला. सिंध प्रांतातील अधिकाऱ्यांनी मास्कचा साठा न उघडता थेट रुग्णालयांना पाठवून दिला. जेव्हा रुग्णालयांनी सामान उघडून बघितलं तेव्हा त्यातून N95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअरपासून म्हणजे अंतर्वस्त्रापासून बनवलेले निकृष्ट दर्जाचे मास्क निघाले.

चीनने पाकिस्तानला विनंती केली होती की दोन देशातील सीमा एक दिवसासाठी खुली करावी. सीमा खुली केल्यास, वैद्यकीय मदत सामुग्री ही पाकिस्तानमध्ये पोहचवता येईल असं विनंती करताना सांगण्यात आलं होतं. चीनच्या दूतावासाने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालाला एक पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की शिंजिआंग उईघर या स्वायत्त भागाच्या गव्हर्नरना गिलगिट बाल्टीस्तानसाठी ही मदत सामुग्री देण्याची इच्छा आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘डॉन’ ने दिलं होतं.

या सामुग्रीत काय असेल याची पाकिस्तानमध्ये बरीच उत्सुकता होती. सिंध प्रांताच्या अधिकाऱ्यांना मदत पोहचवण्याची इतकी घाई होती की त्यांनी नेमकं काय सामान आलं आहे हे न पाहता मास्क रुग्णालयांना पाठवून दिले. याबाबतचे वृत्त पाकिस्तानमधल्या एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले असून त्यात त्यांनी ‘चीनने चुना लावला’ अशा शब्दात या घटनेचं वर्णन केलं आहे.

शिंजिआंग उईघर या स्वायत्त भागाच्या गव्हर्नरनी पाकिस्तानला 2 लाख साधे मास्क, 2 हजार N95 मास्क,5 व्हेंटीलेटर्स, 2 हजार टेस्टींग किट आणि 2,000वैद्यकीय सुरक्षा कपडे पाठवणार असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनकच आहे. पंजाब प्रांतात 1072, सिंध प्रांतात 839 खैबर पख्तुन्वा भागात 343, बलुचिस्तानमध्ये 175 तर गिलगिट बाल्टीस्तानमध्ये 19३ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तिथला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा शुक्रवारपर्यंत 2709 इतका होता. पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या