चैत्र एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आरास, वारी रद्द झाल्याने पंढरीत शुकशुकाट…

1487

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील चैत्र वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. असं असलं तरी या दिवशीच्या वारीची परंपरा प्रतिकात्मक पद्धतीने याहीवर्षी जोपासली जाणार आहे. काही मोजकी महाराज मंडळी परंपरा जोपण्यासण्याचे काम शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पूर्ण करणार आहेत. विठ्ठल रखुमाई मंदिराचे दरवाजे व्यवस्थापनाने बंद केले आहेत. असे असले तरी देवाचे रोजचे सर्व नित्य उपचार सुरु आहेत. प्रथेप्रमाणे शनिवारी चैत्री एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई ची विधिवत महापूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

पंढरीत भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्या पैकी चैत्र वारीचा समावेश आहे. साधारणपणे तीन ते चार लाख वारकरी भाविक या वारीच्या सोहळ्याला हजेरी लावत असतात. शनिवारी मात्र पंढरीत शुकशुकाट पाहायला मिळाला. चंद्रभागेचे वाळवंट सुनेसुने झाले आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर नीरव शांत आहे. वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. इथली वारीची परंपरा आजवर कधीही खंडीत झाली नव्हती, मात्र जीवघेण्या कोरोना आजाराच्या उद्रेकामुळे यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या