घाटी रुग्णालयातील मेडिसीन इमारतीमध्ये सुरू झाले ‘कोव्हीड हॉस्पिटल’, अत्यवस्थ रुग्णांवर होणार उपचार

405

संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीनची इमारत ही आता कोव्हीड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे. अत्यवस्थ कोरोनाग्रस्तांवरच या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. ही इमारत पुर्णपणे ऑक्सीजनरहीत असून येथे 150 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये 100 खाटा या ‘आयसोलेशन’, 42 खाटा ‘कोव्हीड पॉझिटिव्ह’ आणि 8 खाटा ‘आयसीसीयू विथ व्हेंटीलेटर’ साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सुपरस्पेशलिटीत जाणार मेडिसीन विभाग
घाटी रुग्णालयात सद्यस्थितीत अन्य आजारांच्या रुग्णांची संख्या कमी आहे. यामुळे मेडीसीन विभाग कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या रुग्णालयात परावर्तित करण्यात फार अडचणी आल्या नाहीत. भविष्यकाळात अन्य आजारांची रुग्णसंख्या वाढली तर काय करायचे याचा देखील विचार करण्यात आला आहे. घाटी रुग्णालयाच्या आवारात असलेले 268 खाटांच्या सुपरस्पेशलिटी विभागात सद्यस्थितीतील मेडिसीन विभाग हलवता येऊ शकतो. या सुपरस्पेशलिटी विंगचे बहुतांश काम पूर्ण झाली असून तिथे फक्त सेंट्रल ऑक्सिजन जोडणीचे काम शिल्लक आहे. हे काम येत्या दहा बारा दिवसात पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या