पिंपरी परिसरात दारू आणि गुटख्याची तस्करी

459

संपूर्ण शहरात संचारबंदी असतानाही दारू आणि गुटख्याची तस्करी सुरू असल्याचे दिसून आहे. लॉकडाऊन काळात तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. बुधवारी (दि. 8) याबाबत सांगवीमध्ये दोन तर भोसरीमध्ये एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सांगवीमध्ये भोलाराम जयराम चौधरी (वय 31, रा. श्रीकृष्णनगर, पिंपळे गुरव) याच्याविरूद्ध तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी हा गुटक्याची तस्करी करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी चौधरीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे असलेला63 हजार 866 रुपयांचा गुटखा जप्त केला.

तस्करीसोबत बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुकही सुरू
चिखली कुदळवाडी येथून टेम्पोमधून 82 प्रवाशांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये निघालेल्या टेम्पो चालकास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि. 8) पहाटे मोशी टोलनाका अडविले होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक गोविंद राम सुखहारी (वय 24, रा. इसाक ट्रान्सपोर्ट, कुदळवाडी, चिखली) आणि टेम्पोचा मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या