मास्क न लावल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसाला धमकावले, पिंपरीत दोघांना अटक

954

पिंपरी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. संदीप बबन उंदरे (वय 33) आणि हिमांशू सिंग (वय 24, दोघेही रा. गावडे नगर, लिंक रोड, चिंचवड) अशी या दोघांची नावे आहेत. देशात आणि राज्यात संचारबंदी तसेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही संदीप आणि हिमांशू बेफिकीरपणे दुचाकीवरून फिरत होते. या दोघांनी मास्कही लावला नव्हता.

शगुन चौक, पिंपरी इथे या दोघांना पोलिसांनी अडवले. तोंडाला मास्क का लावला नाही असा प्रश्न विचारताच या संदीप उंदरेनी पोलिसांना धमकवायला सुरुवात केली. ‘ तुला माहिती आहे का, मी महापालिकेला मोठा अधिकारी आहे. मी तुम्हाला दाखवतोच’ असं म्हणत संदीप उंदरेने गोंधळ घालायला सुरुवात केली. पोलिसांनी पाठी बसलेल्या हिमांशूला पोलिसांनी नाव विचारले तेव्हा तो बेफाम दारु प्यायला असल्याचे त्यांना कळाले. तो इतका दारू प्यायला होता की त्याला त्याचे नावही नीट सांगता येत नव्हते. यामुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई व पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयात मास्क घालणे बंधनकारक

मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (एमएमआर) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (पीएमआर) सर्व शासकीय सर्वशासकीय,निमशासकीय,महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रवेश ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिंन्हा यांनी काढले आहे. राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना विषाणुचा (COVID-१९) प्रसार होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्यासंबंधीच्या विविध सूचना देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (MMR.) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासकीय कार्यालयामध्ये हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ही सूचना केली आहे. मास्क न घालणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नसून पुढील आदेश येईपर्यंत ही सूचना लागू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या