राज्य पोलीस दलातील दोनशे योद्धे शहीद

305

कोरोनाविरोधात लढताना राज्यातील दोनशे पोलीस आतापर्यंत शहीद झाले आहेत. त्यात 20 अधिकारी आणि 182 अंमलदारांचा समावेश आहे. तर सद्यस्थितीत तीन हजार 724 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनापासून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाच कोरोनाची मोठय़ा प्रमाणात लागण होत आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत 19 हजार  756 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 15 हजार 830 पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले, तर 460 अधिकारी आणि तीन हजार 264 अंमलदार असे तीन हजार 724 पोलिस कोरोनावर उपचार घेत आहेत.  मात्र 202 पोलिस कोरोनाविरोधातील लढाई हरले. यात मुंबई पोलीस दलातील योद्धय़ांचा समावेश अधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या