पाहुण्यांमुळे शिरूरजवळच्या न्हावरे गावात भीतीचे वातावरण

1692

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याध्ये न्हावरे गावात 216 व्यक्ती या बाहेर गावातून आलेल्या आहेत. या पाहुण्यांची माहिती तिथल्या ग्रामपंचायतीने दिली आहे. या पाहुण्यांमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ही भीती लक्षात घेऊन न्हावरे ग्रामपंचायत व ग्रामीण रुग्णालयातर्फे बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून विलगीकरणात जावे अशी विनंती करण्यात आली आहे. बाहेरगावातून आलेले हे पाहुणे घरात विलगीकरण व्यवस्थित पाळत आहेत अथवा नाही हे पाहण्यासाठी आशाताईंना जबाबदारी देण्यात आली आहे. विलगीकरणात असलेल्या बहुतांश व्यक्ती या निरोगी असून काही जणांना सर्दी, खोकला झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही असं ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने म्हटले आहे. ऋतु बदलामुळे सर्दी,खोकल्याचा त्रास होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. असा व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यांमध्ये प्राथमिक उपचार घ्यावेत आणि पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये तसेच कोणाच्या संपर्कात येऊ नये असे ग्रामपंचायत व ग्रामीण रुग्णालय न्हावरे यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. गावात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांच्या पाहुण्यांना आता ही गोष्ट कशी समजावून सांगायची असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या