पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात, सामाजिक संस्थेने केली जेवणाच्या डब्याची सोय

632

इतर जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची लॉकडाऊनमुळे अडचण होत आहे. संचारबंदी आणि जमावबंदीमुळे मेस बंद झाल्या आहेत. हॉटेलही बंद असून घरपोच खाणं पोहचवण्याची सुविधा सुरू झाली असली तरी ती परवडत नसल्याने पुण्यातील विद्यार्थ्यांचे बरेच हाल होत होते. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘धोरडे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट’ पुढे आली आहे. या ट्रस्टने दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहाय्याने किमान 350 विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे द्यायला सुरुवात केली आहे. 6 एप्रिलपासून याची सुरूवात झाली असून लॉकडाऊन संपेपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे.  पुण्याच्या वेगवेगळ्या भागात इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील MPSC चे साधारण 800 ते 900 विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवण मिळणे देखील कठीण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांना मदत करून या सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फार मोठी मदत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या