मी घराबाहेर पडायचे थांबवलेय, तुम्हीही गरज नसताना बाहेर पडू नका; 104 वर्षांच्या वांदरकर गुरूजींचे आवाहन

684

रोज सकाळी दहा वाजता रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण मंदिरात जाऊन गीतेचा पंधरावा अध्यायाचे वाचन करणारे, त्यानंतर बाजारपेठेतील दुकानदारांना हाक मारत वृत्तपत्र घेऊन चालत गाडीतळ येथील घरी 104 वर्षांचे महादेव वांदरकर गुरूजी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच गेल्या अनेक वर्षातील दिनक्रम बदलून घरीच मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करत गुरूजी सर्वांना कामाशिवाय बाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत.

वांदरकर गुरूजींनी आज वयाची 104 वर्ष पुर्ण केली.ह्या वयातही वादंरकर गुरूजी चालत शहरातून रोज न चुकता पदभ्रमंती करतात.पण कोरोनाचे संकट येताच त्यांची अनेक वर्षांचा दिनक्रम बदलाय. आज त्यांनी 104 वा वाढदिवस साजरा करताना सर्वांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा आणि सॅनिटायझर वापरा असा सल्ला दिलाय. घरी आलेल्या नातवालाही तू मुंबईत परत जाऊ नकोस. इथेच रहा. मुंबईत कोरोना आहे असं सांगितले होते. पण नोकरी असल्याने नातू मुंबईत गेला.

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, दानशूर भागोजीशेठ कीर यांच्यासोबत वांदरकर गुरूजीनी काम केले आहे. पतितपावन मंदिर बांधण्यासाठी लागणारी जागा विकत घेण्यासाठीची बोलणी करण्यासाठी भागोजीशेठ कीर यांचा प्रस्ताव घेऊन गुरुजी जागामालकांकडे गेले होते. मीठाच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांना ब्रिटिशांकडून मार खाल्ला होता. स्वातंत्र्यपुर्व लढ्यापासून अनेक घटनांचे वांदरकर गुरूजी साक्षीदार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या