घरातील तांदूळ संपले म्हणून जंगलातून कोब्रा मारून आणला, अरुणाचल प्रदेशात तिघांवर गुन्हा दाखल

1121

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये तीन व्यक्ती 12 फूटांचा कोब्रा मारून खांद्यावरून नेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अरुणाचल येथील आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडियोत हे तीन जण म्हणतात, खाण्यासाठी या विषारी सापाला जंगलात मारलंय. जेवणासाठी पूर्ण तयारी केली होती. मांस स्वच्छ करण्यासाठी आणि कापण्यासाठी केळीची पानेही आणली होती. लॉकडाऊनमध्ये घरात खाण्यासाठी तांदूळ उरलेला नाही. म्हणून आम्ही जंगलात आलो आणि काहीतरी शोधत असताना हे मिळालं.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये तीन व्यक्ती 12 फूटांचा कोब्रा मारून खांद्यावरून नेताना दिसत…

Posted by Saamanaonline on Monday, April 20, 2020

किंग कोब्रा हा एक संरक्षित वन्यजीव आहे. त्याला मारणं गुन्हा आहे. अशा प्रकरणात जामीन मिळत नाही. अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ आणि लुप्त होत असलेल्या प्राण्यांची संख्या जास्त आहे.  नुकतंच या ठिकाणी एका विषारी सापाच्या नव्या प्रजातीच्या संशोधकांनी शोध लावला होता. त्याचं नाव जे. के. रोलिंग यांच्या काल्पनिक चरित्रावरून सालाझार स्लाईथरीनच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या