परराज्यातील मजुरांच्या मदतीला शिवसेना सरसावली, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

171

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. कर्नाटक,बिहार, झारखंड मधील कामगार सांगली जिल्ह्यात कामासाठी आले होते. संचारबंदी आणि जमावबंदी असल्याने या कामगारांचे हाल होत असून त्यांची येण्याजाण्याची व्यवस्था बंद झाली आहे. घरातून बाहेर पडता येत नाही, खिशात पैसे नाहीत त्यामुळे अन्नधान्य खरेदी करता येत नाहीये. खायला-प्यायला विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीयेत अशी अडचण या कामगारांची झाली आहे. ही अडचण ओळखून शिवसैनिकांनी या कामगारांना मदतीचा हात दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी परराज्यातून आलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या कामगारांना मदत करायला सुरुवात केली आहे. या कष्टकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने गेले चार दिवस रोज मोफत जेवण देण्यात येत आहे. आमदार अनिल बाबर आणि जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खानापूर इथे या कामगारांना जेवणाव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला आहे. पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, चटणी, साखर, तूरडाळ, मुगडाळ, असं दहा दिवस पुरेल इतकं अन्नधान्य त्यांना देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या