गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी 500 खाटांची व्यवस्था, 2 हजार जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप

3710

बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थान लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘ कम्युनिटी किचन ‘ सुरु केले असून , मंदिराच्यावतीने शहरात दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत . तसेच पाचशे बेड आयोसोलेशनसाठी तयार ठेवले आहे.रुग्णांना,शहरात अडकून पडलेले मजुरांना,गरजू कुटुंबांना ही भोजनाची पाकिटे वाटली जात आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात विविध शहरांमध्ये कोरोनाचे सतरा रुग्ण सापडले आहेत. बुलढाणा शहर हे हाय रिस्क झोनमध्ये आले आहे. अशा परिस्थितीत गरीब मजूर, अडकलेले प्रवासी, बेघर भटके, अनाथ यांना भोजन देण्याकरता जिल्हा प्रशासनाने श्री संत गजानन महाराज संस्थेला विनंती केली होती . त्यानुसार शेगाव संस्थांनी कम्युनिटी किचन सुरू केली असून दोन एप्रिल पासून 2000 लोकांसाठी बकेट स्वरूपामध्ये भोजन प्रसाद वितरीत केला जात आहे . प्रशासनाच्यावतीने समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहेत. बुलढाण्यात तसेच बुलढाणा शहराच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नाथजोगी सारख्या भटक्या समाजालाही संस्थानाच्या मदतीचा लाभ होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या