स्मृती मंधानाला होम क्वारंटाईन केले, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांचा निर्णय

586

सांगलीचं भूषण असलेली आणि हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र ताटे यांनी ही माहिती दिली आहे. स्मृती मंधाना फेब्रुवारीमध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला गेली होती. कोरोनाची साथ फैलावली त्यावेळी ती मुंबईत होती. संचारबंदी आणि लॉकडाऊन होण्यापूर्वी ती तिच्या सांगलीच्या घरी परतली होती. 25 मार्चपासून तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी रोज तिच्या घरी जाऊन विचारपूस केली जात आहे. 5 एप्रिल रोजी तिच्या होम क्वारंटाईनची मुदत संपणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या