सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच, 196 गुन्हे दाखल; 37 जणांना अटक

429
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

देशभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवांचे मेसेज,खोटया बातम्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट फिरवल्या जात असल्याने त्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून आतापर्यंत सायबर पोलिसांनी असे कृत्य केल्याप्रकरणी 196 गुह्यांची नोंद केली आहे.

कुठे जास्त गुन्हे

  • व्हॉटसअप – 93,
  • फेसबुक -61,
  • टिकटॉक -3,
  • ट्विटर-2

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 196 गुन्हे दाखल केलेत. त्यात 188 प्रकरणात एफआयर केला असून 8 प्रकरणात अदखलपात्र गुह्यांची नोंद आहे. दाखल गुह्यांमध्ये 37 आरोपींना अटक करण्यात आली असून 114 आरोपींची ओळखपटविण्यात आली आहे. तसेच अटक आरोपींपैकी 12 जणांवर सीआरपीसी कलम107 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

भडकावू भाषणांचे प्रमाण जास्त

लॉकडाऊनच्या काळात भडकावू भाषणांचे पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आढळून आले आहे. गेल्या सात दिवसात याचे प्रमाण जास्त असून एकूण दाखल गुह्यांपैकी 104 गुन्हे हे सोशल मिडियाद्वारे भडकावू भाषण प्रसारित केल्याप्रकरणातील आहे. तर कोरोना बाबत अफवा तसेच खोटया बातम्या पसरविल्याप्रकरणात 68 गुन्हे दाखल केले आहेत. तर याच संबंधित अन्य 27 गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.

देशभरात गंभीर परिस्थिती असताना कुणीही सोशल मिडियाचा दुरुपयोग करून अफवा, खोटया बातम्या तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, भाषणे पसरवू नये. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल- बालसिंग राजपूत, पोलीस अधिक्षक (महाराष्ट्र सायबर पोलीस)

आपली प्रतिक्रिया द्या