कोरोनाबाबत जनजागृतीसाठी सोनी बीबीसी अर्थने आणला ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ हा लघुपट

1147

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील अब्जावधी लोकं या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी स्व-विलगीकरण (क्वारंटाईन) करत आहेत. या व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी सोनी बीबीसी अर्थने जनजागृतीसाठी एक लघूपट तयार केला आहे. ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ असे त्या लघूपटाचे नाव असून तासाभराच्या या लघूपटात टप्प्याटप्प्याने सर्व माहिती देण्यात आली आहे. डॉ. झँडवॅन तुलेकेन आणि मानसशास्त्रज्ञ किंबर्ली विल्सन यांनी हा लघुपट तयार केला आहे.

झँडवॅन तुलेकेन हे ब्रिटनमधील जनरल मेडिकल काऊन्सिलमधील डॉक्टर आणि ख्यातनाम सादरकर्ते आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते आघाडीच्या तज्ञांना भेट देत असतात. त्यांनी या लघुपटातून कोरोना विषाणूविरोधातील या लढ्यात स्व-विलगीकरण सर्वाधिक का महत्त्वाचे आहे ते सांगितले आहे. हा लघुपट किंबर्ली यांच्यावरही फोकस करतो. ते स्वयं-विलगीकरणाबाबतच्या मानसिक आव्हानांबाबत माहिती देतात. स्व-विलगीकरण करत असताना प्रत्येकाने कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे त्यांची माहिती देतात.

कोरोना विषाणू हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूप काळ जाईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्व-विलगीकरणाद्वारे त्याचा प्रसार कमी करण्यासाठी हातभार लावू शकते. त्यामुळे सोनी बीबीसी अर्थने या काळातील सर्वांत महत्त्वाचा लघुपट ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ सादर केला जात आहे. ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ भारतात दररोज केवळ सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित करण्‍यात येईल

आपली प्रतिक्रिया द्या