बागडोग्रापेक्षा बँकॉकची विमान तिकिटे स्वस्त, कोरोनामुळे पर्यटनालाही फटका

525

कोरोना व्हायरसमुळे चीन, मलेशिया, बँकॉकच्या पर्यटनालाही फटका बसला आहे. मुंबई ते बँकॉक विमान प्रवासापेक्षा पश्चिम बंगालमधील बागडोग्राचे तिकीट महाग झाले आहे.

मुंबई ते बँकॉक विमानचे तिकीट हे 12 हजार 300 रुपये इतके आहे. तर मुंबई ते बागडोग्रा विमानाचे रीटर्न तिकीट हे 13 हजार 500 रुपये इतके आहे. सिंगापूर एअर लाईन्सचेही तिकीट दर कमी झाले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे चीन, मलेशिया आणि बँकॉकच्या पर्यटनाला चांगलाच फटका बसला आहे. दरवेळी या सीजनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरे मीटिंग आणि एक्झिबिशनसाठी या भागात बुकिंग केली जाते. तसेच पर्यटकांचाही ओढा या भागात असतो. परंतु कोरोना व्हायरसच्या भितीमुळे अनेकांनी आपल्या बुकिंग ऐनवेळी रद्द केल्या आहेत.

यंदा हिंदुस्थान आणि दक्षिण आशियातील पर्यटन व्यवसायात 55 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. विमानाच्या शुल्कात कमालीची घट झाली आहे. फक्त विमान नव्हेत तर क्रुझ पर्यटनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. दरवर्षी 50 हजार हिंदुस्थानी क्रूजवर पर्यटनासाठी जातात. परंतु कोरोनामुळे अनेक क्रुझ मालकांनी दक्षिण आशियात येण्यास नकार दिला आहे. अनेक पर्यकटांनी आपला मोर्चा युरोपमध्ये वळवल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. तसेच दुबई, मॉरिशसकडेही लोकांचा ओढा असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या